
अहमदनगर : जिल्ह्यात सरकारने भुमीहीन दलितांना स्वाभिमानाने जिवनमान जगण्या करीता भोगवटादार ( वर्ग २ ) च्या सरकारी जमिनी वाटप केल्या, जेने करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच समतेच स्वप्न, या स्वातंत्र्यात साकार होईल व विषमतेची दरी भरुन निघेल , हा अतीशय छान निर्णय सरकारने घेतला पण ? प्रत्येक्षात घडते वेगळेच ? दीन दुबळ्यांच्या दारीद्रयाचा फायदा घेऊन दलाल आणि लॅण्डमाफीयांनी त्या गोरगरींबांना फसवुन , खोटे नाटे कागदपत्र रंगवुन , नविन शर्तीचा भंग करत , माती मोल किमतीने भुखंड लाटले, आणि दलाल लॅण्डमाफीया मोठे झाले, यात सरकारचा काय दोष ? असे अनेक प्रकरण आज देशात घडत आहे व घडले आहेत ? त्यातील एक जिवंत उदाहरण म्हणजे ? मौजे भाळवणी , ता .पारनेर , जि. अहमदनगर येथील एका कुटुंबाने दोन नविन शर्तीचे भुखंड प्राप्त करुन घेतले,व एक भुखंड दलालाने, लॅण्डमाफीयाने विकत घेतला .
सदर भुखंड घोटाळा प्रकरण, केंद्रीय मानवाधिकार संगठनचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी सरकारच्या निदर्शनास आणुन दिला ( सन २०१९ ते आज अखेर म्हणजे तब्बल ५वर्षे ) सदर प्रकरण खालुन वर आणि वरुन खाली भ्रमन करत राहीले ? यात दोष कोणाचा ? कारण सदर ७/ १२ वर चक्क ?अधिकारी आणि लॅण्डमाफीया , दलाल यांनी ‘ सरकार ‘ ला आळे करुन खरेदीच करुन घेतली , एवढच नाही तर तक्रारदार आणि त्यांच्या मुलांन वर २ वेळा खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र या विकृतीला न डगमगता रघुनाथ आंबेडकर यांनी पाठ पुरवा चालुच ठेवला आणि ५ वर्षा नंतर मा . पी .एल .सोरमारे साहेब ( अप्पर जिल्हाधिकारी ,अहमदनगर ) यांनी दि .१६ / १२ / २o२० रोजी ‘ महाराष्ट्र शासन ‘ असे नाव ७ / १२ वर दाखल करावे असेे ‘ आदेश ‘ पारीत केले आहेत .
तक्रारदार यांचे वतीने सदर कामकाज अॅडव्हाकेट श्री. कल्याणराव पागर यांनी पाहीले आहे . अॅड. श्री .पागर यांचे सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे पण .श्री.आंबेडकर यांच्या कुटूंबात दहशतीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . लवकरच रघुनाथ आंबेडकर हे भितीपोटी शासन दरबारी न्याय मागण्या करीता अमरण ‘ उपोषण ‘ करण्याच्या विचारात आहे. सदर लॅण्डमाफीया ,दलाल,गैरव्यवहार करण्यास मदत करणारे अधिकारी यांचे पासुन ‘ धोका ‘ निर्माण होण्याची असल्याचे श्री.आंबेडकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
