अहमदनगर (दि २१ डिसेंबवर २०२०) :-महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी महापौर व काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रांताध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून सरचिटणीस गणेश पाटील यांच्या सहीने नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत दीप चव्हाण यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी सांभाळण्यासाठी प्रयत्न करू,असा मनोदय व्यक्त केला.