
अहमदनगर (दि १८ डिसेंबर २०२०): प्रतिनिधी -कापड बाजार येथे बोहरी समाजाची मशीद आहे. या मशिदीला महानगरपालिकेने वाणिज्य दराप्रमाणे आकारलेला कर व त्यावर लावलेली शास्तीबाबत बोहरी मशिदीच्या पदाधिकार्यांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत माहिती दिली. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी यात लक्ष घालून संबंधितांकडून माहिती घेऊन नियमाप्रमाणे जादा आलेलाकर माफ करुन दिला. याबाबतचे पत्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी बोहरी समाजाचे धर्मगुरु शेख औनअली डुंगरपुरवाला यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी परेश लोखंडे, जमातचे सेक्रेटरी अब्बासभाई शेख, कमिटी मेंबर हुसेनभाई शेख,जोहेरभाई, शब्बीरभाई, सैफीभाई व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, कापड बाजार येथील बोहरी समाजाच्या मशिदीमध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम होतात. व्यावसायिक वापर नसचाना मनपाकडून चुकीच्या पद्धतीने संकलित कर आकारण्यात आला होता. वास्तविक पाहता मनपा अधिनियम 132(1) (ब) प्रमाणे फक्त धार्मिक कार्य होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने कर आकारणी करता येत नाही. याबाबत आम्ही मनपाकडे कायदेशीररित्या सातत्याने पाठपुरावा करुन चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला कर मागे घेण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे नगरमधील कोणतेही धार्मिक स्थळ जसे मंदिर,मशीद, गुरुद्वारा, चर्च आदींचा वापर जर व्यावसायिक होत नसेल तर त्यांचाही कर कमी करण्यासाठी आमच्याशी किंवा मनपाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी अब्बासभाई शेख म्हणाले, शासनाच्या नियमाप्रमाणे धार्मिक स्थळांचा जर वापर व्यावसायिक होत नसेल तर त्यांना त्याप्रमाणे कर आकारले जातात. परंतु या मशीद ट्रस्टला व्यावसायिक दराने मनपाने कर व शास्ती आकारली होती. याबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना सांगितले. त्यांनी मनपाकडे पाठपुरावा करुन हा जादा कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे यापुढील काळातमशीद नियमाप्रमाणे नियमित कर भरले, असे सांगून याकामी मदत केल्याबद्दल बोराटे व मंगलताई लोखंडे यांचे आभार मानले.
