अहमदनगर- करोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून सिव्हील हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यांपासून नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया विभाग हा बंद ठेवण्यात आला होता. तो मंगळवारपासून सूरु करण्यात आला. गरजूंनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा,तपासणीचा, डोळ्यावरील ऑपरेशनचा व बाह्य रुग्ण तपासणीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्स चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांनी केले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्स चिकित्सक डॉ. महावीर कटारिया, वैद्यकिय अधिकारी डॉ.मनोज घुगे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ.संतोष रासकर, नेत्रतज्ञ डॉ.भुषण अनभुले,डॉ. अजिता गरुड, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ.अशोक गायकवाड,सेविका सुजाता चक्रनारायण, योगेश सोनटक्के आदि उपस्थित होते. डॉ. पोखरणा म्हणाले, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया या सर्व मोफत असून, त्यात औषधे,रुग्णांचे जेवण, शस्त्रक्रिया, काळा चष्मा,भिंगरोपण हे सर्व मोफत दिले जाते. भविष्यात सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेत्र रोगाच्या शस्त्रक्रिया उपलब्ध करण्याचा प्रयत्न असून नेत्र विभागाचे भविष्यात विस्तारीकरण करण्याचे प्रयोजन आहे. डॉ.मनोज घुगे यांनी आभार मानले.