
अहमदनगर : खरेदी करताना प्रत्येक जण गुणवत्तेला महत्त्व देतो. केतन होजिअरीमध्ये गुणवत्तेची खरेदी करता येते. या जोडीला आता स्क्रॅच ऍण्ड विन योजना लागू झाल्याने ग्राहकांच्या खरेदीचा आनंद व्दिगुणित होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन फोक फिटनेसच्या संचालिका श्रध्दा देडगांवकर यांनी केले. नवी पेठेतील प्रसिद्ध केतन होजिअरी अॅण्ड स्पोर्टसवेअर शॉपीत ग्राहकांसाठी स्क्रॅच अॅण्ड विन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या शुभारंभप्रसंगी देडगावंकर बोलत होत्या. याप्रसंगी मंजू मुनोत, नूतन चंगेडिया,केतनच्या संचालिका प्रिया मुनोत, ललिता मुथा, शितल बिहाणी, गिता खटोड, मयुरा खिंवसरा,श्रद्धा वखारिया, अमिता मुनोत, प्रिती गांधी, सुवर्णा मुनोत, मनिषा भळगट आदी उपस्थित होते. स्क्रॅच ऍण्ड विन योजना 30 जानेवारीपर्यंत चालू असून एक हजारांपुढील प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना हमखास गिफ्ट मिळणार आहे. योजनेविषयी प्रिया मुनोत यांनी सांगितले की,जेन्टस, लेडीज, किड्स इनरवेअर, होजिअरी, स्पोर्टस वेअरसाठी 23 वर्षांपासून केतन शॉपी प्रसिद्ध आहे. सध्या खास थंडीनिमित्त स्वेटशर्ट, आकर्षक जर्कीन, थर्मल वेअर, स्वेटर, मफलर, टोपी विविध व्हरायटीत उपलब्ध करून दिले आहेत.सर्व प्रमुख ब्रॅण्ड एकाच छताखाली असल्याने संपूर्ण परिवाराची खरेदी करता येते. नवीन केतनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र विभाग आहे. सर्व प्रकारच्या होजिअरी, स्पोर्टस वेअरची मोठी व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन मुनोत यांनी केले. केतन मुनोत यांनी आभार मानले.

