
अहमदनगर (दि ९ डिसेंबर २०२०) : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आज महाजीवनदान अभियानाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरात अभियानाची सुरुवात करण्यात आली.यावेळी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट, काँग्रेसचे प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, एस. सी. काँग्रेसचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, प्रशांत वाघ, महिला काँग्रेसच्या नलिनीताई गायकवाड, डॉ.जाहिदाताई शेख, डॉ.रिजवान अहमद, अनिस चुडीवाला, सेवादल विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, विद्यार्थी काँग्रेसचे चिरंजीव गाढवे, क्रीडा काँग्रेसचे प्रवीण गीते, अमित भांड, प्रमोद अबूज, बबलू भिंगारदिवे, बंटी तिजोरे, पंकज साठे, सनी भिंगारदिवे, इम्रान बागवान, शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे आदी उपस्थित होते.
