नगर अर्बन बँकेची तातडीने निवडणुक घेण्याच्या मागणीचे निवेदन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना बँकेच्या सभासदांच्या शिष्टमंडळाने दिले. याप्रसंगी अ‍ॅड.विजय मुथा, राहुल जामगांवकर, लक्ष्मीकांत तिवारी, वसंत राठोड, अ‍ॅड.राजेंद्र मुथियान, सुवेंद्र गांधी, नितीन जोशी, प्रशांत मुथा आदिंसह सभासद. (छाया : सिद्धार्थ दीक्षित)

अहमदनगर दि. 08 – नगर अर्बन बँकेची सार्वत्रिक निवडणुक 2019 मध्ये होणार होती.मात्र बँकेवर प्रशासक नेमल्या गेल्याने बँकेची निवडणुक लांबणीवर गेली आहे. मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या 2002 च्या कायद्यानुसार नगर अर्बन बँकेची तातडीने निवडणुक घ्यावी,अशी मागणी बँकेच्या सभासदांच्या शिष्टमंडळाने बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन नवीदिल्ली येथील सहकार विभागाचे केंद्रीय निबंधकांनाही पाठविण्यात आले आहे. यावेळी अ‍ॅड.विजय मुथा, राहुल जामगांवकर,लक्ष्मीकांत तिवारी, वसंत राठोड, अ‍ॅड.राजेंद्र मुथियान, सुवेंद्र गांधी, नितीन जोशी, प्रशांत मुथा आदिंसह सभासद उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1910 साली स्थापन झालेल्या नगर अर्बन बँकेने गेल्या 110 वर्षात विकासाची मोठी उंची गाठली आहे, मात्र गेल्या 15 महिन्यांपासून बँकेवर प्रशासक नेमले गेले आहेत,त्यामुळे बँकेच्या प्रगती खुंटली आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार यांची तातडीने बँकेची निवडणुक घेण्याची मागणी आहे. या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार व्हावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर नागेश गिरवलकर, बिपीन खंडेलवाल, बाबासाहेब ढाकणे, श्रीकांत कुलकर्णी, शिवाजी दहिंडे, नितीन जोशी, रोशन गांधी, अभिजित चिप्पा, श्रीगोपाल जोशी, विकास वाघमोडे,विजय गांधी, बाळासाहेब पोटधन, अनिल गांगर्डे, गणेश साठे आदिंच्या सह्या आहेत.