
अहमदनगर । शहर व उपनगरामध्येचोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी अशा मागणीचे पत्र महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.अहमदनगर शहर व उपनगरामध्ये चो-यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गेल्या 9 ते 10 महिन्यापासून कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे नागरिक त्रस्त आहेत.अनेक नागरिकांना कोरोनामुळे कामधंदा नाही. नागरिक घरी बसून होते.सामान्य माणसांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध होत नव्हता. सध्याच्या परिस्थितीमध्ये कामधंदे थोडया प्रमाणात सुरू झालेले आहेत.केडगांव, सावेडी व उपनगरामध्ये येत्या 8 दिवसा पासून चो-यांचे प्रमाणात वाढ झालेली आहे.त्यासाठी रात्रीची गस्त व बंदोबस्त वाढविणे आवश्यक आहे.
