
अहमदनगर ः केंद्र व राज्य सरकारने विविध विकास कामासाठी शहरामध्ये निधी प्राप्त करून दिलेला असून ती कामे जलदगतीने व चांगल्या दर्जे ची करून घेण्याचे काम मनपा अधिकारी व ठेकेदार यांनी करावी. आकाशवाणी ते भिस्तबाग चौक व महालापर्यतच्या रस्त्याच्या कामासाठी मा.शासनाने सुमारे साडेतीन कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्याच्या कामावर अधिकार्यांनी लक्ष केंद्रीत करावे व नगरकरांसाठी मॉडेल रस्ता करावा. या रस्त्याच्या कामामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु टप्प्या टप्प्याने अनेक अडचणीवर मार्ग काढीत रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असून लवकरच हा रस्त्याचे काम मार्गी लागेल.
उपनगराला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. दोन्ही बाजूने फुटपाथ व डिव्हायडर तयार करण्यात येणार आहे असे प्रतिपादन आ.संग्रामभैय्या जगताप यांनी केले आहे.कुष्ठधाम रस्त्याची आ. संग्रामभैय्या जगताप यांनी पाहणी केली यावेळी विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, सभागृह नेते मनोज दुलम, राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक स्वप्निल शिंदे, डॉ.सागर बोरूडे, ज्येष्ठ नगरसेवक तायगा शिंदे,मा.श्री.जयंत येलूलकर, माजी नगरसेवक अजिक्य बोरकर,बाळासाहेब पवार, निखील वारे, भाजपा सावेडी मंडल अध्यक्ष सतिष शिंदे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष मा.श्री.सुमित कुलकर्णी, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखी,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे,राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे आदी उपस्थित होते.
यावेळी विरोधीपक्ष नेते मा.श्री.संपत बारस्कर म्हणाले की, या रस्त्याच्या कामामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आ.संग्रामभैय्या जगताप यांनी या अडचणीवर मात करून रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. या रस्त्याच्या मध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईन होत्या त्या स्थलांतरीत कराव्या लागल्या तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणे होती ती काढावी लागली. लाईटचे खांबही रस्त्याच्यामध्येभागी येत होते ते स्थलांतरीत करण्याच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. हा रस्ता डांबरीकरण व कॉक्रीटीकरण या दोन टप्प्यात होणार आहे.
उपनगराच्या विकासाला चालना मिळणार आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठया प्रमाणात वृक्षारोपन करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. तरी लवकरात लवकर नगरकरांसाठी हा मॉडेल रस्ता पूर्ण करण्यात येईल असे ते म्हणाले.
