
अहमदनगर ः मागील 72 वर्षांची परंपरा कायम ठेवत 73वा वार्षिक निरंकारी संत समागमयावर्षीजगाची वर्तमान परिस्थिति लक्षात घेऊन व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात येत आहे. शुभारंभ शनिवार दिनांक 5 डिसेंबर, 2020 रोजी होत आहे. या संत समागमामध्ये देश-विदेशातील अनेक संस्कृती, सभ्यता आणि बहुरंगी छटांचे दर्शन होईल. समागमाचा प्रारंभ 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता सत्संगाच्या रुपात होईल ज्यामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपला मानवतेच्या नावे संदेश प्रेषित करतील.
त्यानंतर सत्संग कार्यक्रमाच्या शेवटी रात्री 8.30 ते 9.00 वाजेपर्यंत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या दिव्य प्रवचनाद्वारे आपले पावन आशीर्वाद प्रदान करतील.समागमाचे प्रसारण तिन्ही दिवशी मिशनच्या वेबसाईटवर सायंकाळी 4.30 से रात्री 9.00 वाजेपर्यंत तसेच संस्कार टी.व्ही.चॅनलवर सायंकाळी 5.30 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत प्रसारित करण्यात येईल.
समागमाच्या दुसर्या दिवशी 6 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सेवादल रॅली आयोजित करण्यात येईल. या रॅलीमध्ये भारतवर्ष तसेच विदेशातील सेवादल बंधु- भगिनी शारीरिक व्यायाम, खेळ,विविध कसरती तसेच मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिका दर्शविण्यात येतील. ही रॅली सद्गुरु माताजींच्या आशीर्वचनांद्वारे संपन्न होईल.सायंकाळी 4.30 पासून सत्संग कार्यक्रम आयोजित होईल. सत्संग समारोहाच्या शेवटी रात्री 8.30 ते 9.00 या वेळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या दिव्य प्रवचनांद्वारे समस्त भाविक-भक्तगणांना आपला आशीर्वाद प्रदान करतील.
तिसर्या दिवशी स्थिर प्रभुशी मनाला जोडू या, जीवन आपुले सहज करु याया विषयावर जगभरातील कवी सज्जन विविध भाषांमध्ये आपल्या शुभ भावना कवितांच्या माध्यमातून प्रस्तुत करतील. समागमाचे समापन रात्री 8.30 ते 9.00 दरम्यान होणार्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य प्रवचनाने होईल. वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी पूर्ण समर्पित भावनेने व सजगतेने सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करत केली गेली आहे.
यावर्षी समागमाचा मुख्य विषय स्थिरतायावर आधारितगीत, विचार, कविता यांचे प्रस्तुतीकरण समागमाच्या माध्यमातून केले जाईल. त्याचे रेकॉर्डिंग काही टीममेम्बर्सना मिशनच्या दिल्ली मुख्यालयामध्ये बोलावून करण्यात आले आहे. जरी हा संत समागम व्हर्च्युअल रुपात होत असला तरी जेव्हा याचे प्रसारण केले जाईल तेव्हा भक्तगणांना दरवर्षीप्रमाणे आपण प्रत्यक्ष समागम स्थळी उपस्थित आहोत, अशी अनुभूती यावी. यासाठी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाद्वारे मिशनच्यावतीने प्रयास करण्यात आला आहे. या समागमाचा मुख्य उद्देश सत्य, प्रेम आणि एकत्वावर आधारित शांतिपूर्ण सह-अस्तित्वाने युक्त मानव समाजाची निर्मिती करणे तसेच आपल्या स्वभावामध्ये स्थिरतेचा अंगीकार करुन जीवन सहज सुंदर करणे हा आहे.
