अहमदनगर (दि ४ डिसेंबर २०२०) : सकाळ वृत्तसमूहाचे निवासी सम्पादक बाळ बोठे पाटील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्ता रेखा जरे पाटील खून प्रकरणात फरारी आहे.अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात सकाळ वृत्तसमुहाचे वृत्त संपादकांचा ऑरा काय होता ते वेगळे सांगणे गरजेचे नाही. मध्यन्तरी हनी ट्रॅप बद्दल एक गीतमाला सादर करून त्या गीतमालेतील पार्शवगायक स्वतः बोठेच निघेल हे कोणाच्या ध्यानी मनी नसेल आणि काहींच्या असेलही तर ते बाहेर बोलण्या इतपत नसेल परंतु काही गोष्टी या आपल्या ज्ञानसम्पदा, डॉक्टरेट आणि अवाढव्य पुस्तकी लिखाणाच्या पडद्या मागे झाकून जातील. या विचाराने एखादा व्यक्ती गुन्हेगारीकडे वळेल आणि कोणालाही याबाबत संशय होणार नाही अशा प्लॅनिंगने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता रेखा जरे पाटील यांचा अपघात घडवून हा मृत्यू अपघाती असल्याचा बनाव आरोपी बोठे पाटील आणि कंपनी ने तयार केला होता तो प्लॅन फसला.

पुढे हा खून करण्यात सकाळ वृत्त समूहाच्या निवासी सम्पादकाला आणि त्याच्या आरोपी सहकाऱ्यांना यश आला अशी माहिती आरोपींनी दिली. सध्या बोठे पाटील फरारी असून पोलिसांनी त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे.जो पर्यंत जरे पाटील खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठे पाटील हाती येत नाही तोपर्यंत खुनाचा मुख्य उद्देश आणि कारण समोर येणार नाही त्यासाठी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि त्यांच्या टीमने पथके लावली आहेत आणि बोठे च्या घराच्या झाडा झडतीतूनही अनेक पुरावे हाती आल्याचे खात्रीलायक समजते.

सकाळ वृत्त समूहाच्या निवासी सन्मादकाने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला ठार करण्यामागील मुख्य कारण ?

गुन्हेगारी हनी ट्रॅप आणि मोठ्या प्रमाणातील व्हाईट कॉलर म्हणा किंवा काळे धंदेवाले म्हणा ब्लॅक मेलिंगचा प्रकार सर्व बाहेर येणारच त्याच बरोबर खून प्रकरणी अत्यन्त प्रभावी आणि उत्कृष्टपणे पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि त्यांचा पथक यांनी खुनाचा तपास आणि ५ आरोपींना अत्यन्त शिताफीने अटक करण्यात यश मिळविले आणि खाकी वर्दीतील पोलिसांनी अत्यन्त उत्तम कामगिरी करून मुख्य सूत्रधाराला आणि त्या सूत्रधारामागेही कोणी दिग्ग्ज मास्टर माईंड आहे कि काय हेही लवकरच उघड होईल.

शेवटी काय तर गुन्हेगारीचा अंत हा कधीच योग्य होत नाही याची अनेक उदाहरने नगरकरांनी अनुभवलेली आहेत. असो याचा अर्थ असाही नाही कि प्रत्येक पत्रकार आणि पत्रकारिता हि कधीच गुन्हे आणि गुन्हेगारी कृत्यांना पाठबळ देणारी नाहि आणि पत्रकार म्हणून जनतेने एकाच नजरेने प्रत्येक पत्रकार,सम्पादक,वृत्त समूह प्रमुखांना पाहू नये.काही गुन्हेगारी सदृश कृत्य करणारे असतील तर कायदा आणि पोलिसी खाक्या दाखविल्यानंन्तर अनेक पोपट बोलू लागतात या खून प्रकरणात आणखीनही मोठं मोठी नावे बाहेर येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही परंतु जो पर्यंत मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती येत नाही तोपर्यंत या केसचा संम्पूर्ण उलगडा होणार नाही सकाळ वृत्त समूहाच्या निवासी सन्मादकाने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला ठार करण्यामागील मुख्य कारण हे अजूनही बाहेर आलेले नाही हनी ट्रॅपच मुख कारण असल्याची चर्चा संम्पूर्ण शहरात आहे मात्र सकाळ वृत्त समूहाचे बोठे हाती आल्या नंतरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल रहस्य उलगडेल तो पर्यंत वेट आणि वाच.