अहमदनगर (दि ४ डिसेंबर २०२०) । प्रतिनिधी – शहरातील सद्यस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा नगर-पुणे रोडवर मार्केटयार्ड चौकात आहे. हा पुतळा इतरत्र हलविण्याकामी यापूर्वी वेळोवेळी बैठक झाल्या आहेत. यासाठी प्रशासनाने नगर- पुणे रोडवरील सध्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या प्रांगणात जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, सुरेश बनसोडे, नगरसेवक राहुल कांबळे,परिमल निकम, संतोष गायकवाड, संजय कांबळे, सिध्दार्थ आढाव, दीपक गायकवाड, अंकुश मोहिते, कौशल गायकवाड, किरण दाभाडे, सुशांत म्हस्के, समीर भिंगारदिवे, संध्या मेढे, सुरेश वैरागळ, अशोक कोदार, पवन भिंगारदिवे, सतीष साळवे, संतोष लोखडे, नितीन घोरपडे, दीपक सरोदे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सद्य स्थितीत असलेली जिल्हा परिषदेच्या मालकीची नगररचना योजना क्रमांक 3 अंतिम भूखंड क्र.195 मधील 10 गुंठे जागा नगर महापालिकेकडे वर्ग करावी. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संदर्भीय पत्र 2 अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनाही विनंती करण्यात आलेली आहे. सदरची जागा मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण जिल्हाधिकारी यांना आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.