
अहमदनगर (दि ३ डिसेंबर २०२०) (प्रतिनिधी) : भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भाळवणी पारनेरचे ज्येष्ठ सिने अभिनेते रघुनाथ जगन्नाथ आंबेडकर यांची निवड करण्यात आली. आंबेडकर यांनी पारनेरसह अहमदनगर शहरात आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आणि जनजगृतीचे कामे केलेली आहे. मराठी चित्रपट आणि नव्या कलाकारांना योग्य संधी मिळवून देण्याचे कामही आंबडेकर करत असतात अनेक चित्रपटातून विविध रंगी भूमिका रघुनाथ आंबेडकर यांनी साकारल्या आहेत.त्यांच्या या बहुगुणी आणि सामाजिक बांधिलकेतून तळागाळातील समविचारांना एकत्रित करून देश हितार्थ तसेच जनहितार्थ कार्य करून संघटनेच्या रोपट्याचे वट वृक्षात रूपांतर करण्यासाठी आपली भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या उपाध्यक्षपदी करणेत आली असल्याचे पत्र नुकतेच रघुनाथ आंबेडकर यांना देण्यात आले. या निवडीबद्दल भाळवणी,पारनेर आणि अहमदनगर जिल्हयातील विविध स्तरातून,सामाजिक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
