
अहमदनगर (दि ३ डिसेंबर २०२०) : शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा झपाट्याने विस्तार होत आहे.नवीन चेहरे पक्षाच्या प्रवाहात येत आहेत. काँग्रेस हा सर्वसमावेशक विचारधारा असणारा पक्ष आहे.शहरात काँग्रेस पक्षाची वाढ होत आहे, ही बाब समाधानकारक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे आ.डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. शहर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक पक्ष कार्यालयात पार पडली.यावेळी आ. तांबे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे होते.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.रिझवान अहमद, खलील सय्यद, निजामभाई जहागीरदार,अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष वाघमारे,महिला काँग्रेसच्या नलिनीताई गायकवाड, उषाकिरण चव्हाण, जरीना पठाण, सुनीताताई बर्वे, डॉ. दिलीप बागल, चेतन रोहोकले, मोहनराव वाखुरे,युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, विशाल कळमकर,क्रीडा काँग्रेसचे प्रवीणभैय्या गीते,प्रमोद अबूज, अमित भांड आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे रियाजभाई शेख, अनंतराव गारदे, मुबीनभाई शेख, अन्वर सय्यद, शानूभाई सय्यद, इम्रान बागवान, संजय भिंगारदिवे, शंकर आव्हाड, प्रसाद शिंदे, सिद्धू झेंडे, मंगेश शिंदे, गणेश आपरे, अनिसभाई चुडीवाल, अप्पासाहेब लांडगे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत आ. तांबे यांनी नगर शहरामध्ये पक्षाच्या सुरू असणार्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला.शहरासह उपनगरांमध्ये पक्ष मजबूत करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. विविध फ्रंटलच्या बांधणीबाबत तांबे यांनी बैठकीत तपशीलवार आढावा घेत लवकरात लवकर या विभागांच्या प्रमुखांच्या निवडी करण्याबाबत सूचना केल्या.
