
संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिला गेलेला १२ राज्यपाल नियुक्त जागांची घोषणा अजूनही झालेली नसून राज्यपाल या नियुक्त्यासाठी वेळ आणखीन वाढवून घेण्याची शक्यता असून वेळप्रसंगी दिलेल्या यादीत काही प्रमाणात किंवा संपूर्ण यादीच नवी द्यावी लागेल अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते राज्यपालांच्या मर्जीतले उमेदवार नव्या यादीत असणे गरजेचे आहे असे झालेल्या घटनाक्रमानुसार कळते. आता यावरून हेही समजते कि इच्छूक उमेदवार जर राज्यपालांच्या योग्य सम्बधातील असला तर आताही वेळ गेलेली नाही कोणत्याची पक्षातील कोणत्याही नेत्याने फक्त नाव सुचविणे इथपर्यंतच अधिकार असून यादी जाहीर करणे आणि या बाबत आदेश जारी करणे सर्वस्वी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हातात आहे.
राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरिषदेवर बारा जणांच्या नियुक्तीबाबत वेळकाढू धोरण अवलंबल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये यासंदर्भात खलबते झाली असल्याचे समजते.राज्यपालांनी सत्ताधारी पक्षांकडून पाठवलेल्या बारा जणांच्या नावाला हरकत घेऊ नये यासाठी या बाराही जणांची नावे मंत्रीमंडळामार्फत शिफारस करून राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नावांवर पंधरा दिवसांत शिक्कामोर्तब होण्याची विनंती केली होती.
राज्यपालांकडून हिरवा कंदील न मिळाल्यामुळे आणि तो कालावधी उलटून गेला असल्याने सत्ताधारी पक्षांची कोंडी झाली आहे.यामुळे सत्ताधारी पक्षांची चिंता आणखी वाढली आहे. ती दूर करण्यासाठी बारा जणांची नावे राज्यपालांनी तातडीने मंजूर करावीत यासाठी पुढील आठवड्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्याचे संकेत शरद पवार यांनी या भेटीत दिले असल्याचे समजते.पवार यांची आपण भेट घेतली असल्याची माहिती राऊत यांनी ट्विट करून दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात पवारांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक व उत्साह थक्क करणारा आहे. संकटे व असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा राऊत यांनी केला आहे.
