अहमदनगर (दि १ डिसेंबर २०२०) – उपकेंद्र सहाय्यक पदासाठी बी एस बी सी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत लावल्यात आल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर च्या वतीने महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं करुन ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी संजीव भोर पाटील, बाळासाहेब पवार, बाळासाहेब हराळ, सर्जेराव शिंदे,किरण तराळ, प्रवीण थोरात,अनिकेत आवारे, प्रशांत काळे,सचिन रेडे, राजेंद्र भोर, गणेश थोरात, सागर बडे, राहुल काळे,प्रशांत लवांडे, श्रीपाद दगडे,गोरख आढाव, चंदू नरवडे,श्याम झीने आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरण विभागात उपकेंद्र सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्या अनुषंगाने एक व दोन डिसेंबर रोजी कागदपत्रे पडताळणी कार्यालयात होत आहे परंतु या कागदपत्र पडताळणी मधून मराठा समाजातील एस ई बी सी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे मराठा समाजावर अन्याय आहे एस ई बी सी प्रवर्गातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा एक व दोन तारखेला कागदपत्रे पडताळणी पूर्ण करण्यात यावी मराठा समाजातील मुलांना भरतीप्रक्रियेत ढवळून एक प्रकारे मराठा समाजाची अवहेलना केली जात आहे याविरोधात मराठा समाजात प्रचंड संतापाची भावना आहे महावितरणाच्या उपरोक्त कृतीचा सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा जाहीर निषेध करीत असून उपरोक्त चूक तात्काळ सुधारण्यात यावी अन्यथा मराठा समाजातून या विरोधात तीव्र प्रक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही 29 नोव्हेंबर रोजी पुणे येथे पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयास अनुसरून सदर न्याय मागणीसाठी 1 व 2 डिसेंबर रोजी अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय येथे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले.