
अहमदनगर (दि २४ नोव्हेंबर २०२० पारनेर) : नगर – कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथील पारनेर बायपास चौकात रविवारी दुपारी 2 लाख 96 हजार रूपयांची देशी-विदेशी दारू पारनेर पोलिसांनी जप्त केली आहे पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर पोलिस दूरक्षेत्रातील साह्यक फौजदार शिवाजी कडुस पोलिस कॉन्स्टेबल सुरज कदम पो.कॉ.गणेश पंधरकर व पो.कॉ श्रीनाथ गवळी पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे यांनी रविवारी दुपारी कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी अवैध धंदे व अवैध दारू विक्रेत्या विरोधात कारवाई सुरू केली आहे पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी मागील काही दिवसांपूर्वी पारनेर पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारल्यापासून ही सर्वात मोठी कारवाई आहे पारनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
