
अहमदनगर (दि २४ नोव्हेंबर २०२०) – जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी तिसर्यांदा फेरनिवड झाल्याबद्दल पै. मोसीम शेख यांचा नियुक्तीचे पत्र देऊन प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सत्कार केला. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस प्रशांत ओगले, जिल्हा कार्याध्यक्ष सोमेेशर दिवटे, संगमनेर शहर युवक अध्यक्ष निखिल पापडेजा आदी उपस्थित होते.याप्रसंगी सत्यजित तांबे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना पक्ष असून, कार्यकर्त्यांमुळे तळागाळापर्यंत पक्षाचे कार्य आहे.काँग्रेस पक्षात काम करणारा कार्यकर्ता हा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून त्यांचे प्रश्न सोडविणार आहे.
पै. शेख यांनी पक्षात दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा जबाबदारी देत आहोत. ही जबाबदारी ते आणखी चांगल्या पद्धतीने पार पाडतील, असा विेशास श्री.तांबे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी पै. शेख म्हणाले, पक्षाने दिलेल्या प्रत्येक काम आपण प्रामाणिकपणे केले असून, काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहचवून त्यांच्या अडचणी सोडविल्या आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात पक्षाचे काम वाढवू.
