
अहमदनगर दि २३ नोव्हेंबर २०२० : दोन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून नगर शहर कचरा कुंडीमुक्त झाले. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे नगर शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात 30 व्या स्थानावर आले. आता पुन्हा स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाले असून सर्व नगरकरांच्या सहकार्यातून नगर शहर देशात टॉपटेन करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी केले. प्रभाग क्र. 14 मधील सारसनगर येथे भूयारी गटार अमृत योजना उद्घाटन प्रसंगी आ जगताप बोलत होते.
यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, भाऊसाहेब पांडुळे, महादेव कराळे, छबुराव कांडेकर, धर्मा करांडे, नाना फुलसौंदर, सुरेश आंबेकर, शिवाजी विधाते, सचिन कोतकर, भिमराव ठोकळ, बापुसाहेब ओहोळ,समीर खडके, बाळू धामड, बाबासाहेब भगत, प्रकाश कराळे, राहुल भंडारी, किसन नवसुपे,प्रकाश इवळे, नारायण इवळे, गजानन ससाणे, राजू ससाणे, रामेेशर कचोरिया आदी उपस्थित होते.
यावेळी आ. जगताप पुढे म्हणाले की,स्वच्छता असल्यास आरोग्य समस्या निर्माण होत नाही. शहरातील विकास कामांमुळे शहराचा व उपनगरांचा विस्तार वाढत आहे. स्वच्छतेबरोबरच शहरातील पथदिव्यांचा प्रश्न येत्या तीन महीन्यात मार्गी लागणार आहे. विद्युत खांबांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. भुयारी गटार योजनेचे काम लवकरच पुर्ण होत आहे.
प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. प्रकाश भागानगरे म्हणाले की, सारसनगर परिसरात भूयारी गटार योजनेचे काम गतीमान आहे.प्रभागाच्या विकासासाठी कामांचे नियोजन केलेले असून निधी प्राप्त होताच कामांना सुरुवात होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे श्री भागानगरे यावेळी म्हणाले.
