पारनेर- तालुक्यातील पळवे गावातील सैनिक संघटनेबरोबरच गावातील महिलांनी समाजकार्याबरोबर महिलांचे सशक्तीकरण कसे होईल,या उद्देशाने पळवे गावात राजमाता जिजाऊ माजी सैनिक स्वयंसहाय्यता महिला बचत गट स्थापन केला. पुणे महानगरपालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातील बचत गट मिळून 44 बस देऊन एक डेपो चालविण्याचा निर्धार केला आहे.या उपक्रमात पळवे येथील बचत गटाने 47 लाख रुपये किंमतीची बस 7 वर्षांकरिता करार करुन दिली आहे, अशी माहिती बचतगट अध्यक्षा स्वाती शांताराम तरटे यांनी दिली. या उपक्रमात बचत गटातील जनाबाई तरटे, हिराबाई तरटे, सुनीता तरटे,तेजश्री तरटे यांनी पुढाकार घेऊन नवीन असा उपक्रम प्रथमच पळवे गावाच्या व महिला बचत गटाच्यावतीने करण्यात आला. या बसचे लोकार्पण
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले.