अहमदनगर (७ नोव्हेंबर २०२०) : अतिवृष्टीमुळेच्या पाण्यामुळे शहरासह उपनगरमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. सावेडी उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक वस्ती वाढल्यामुळे रहदारीचे प्रमाणही वाढले आहे. उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी नगरसेविका शोभाताई बोरकर व ज्योतीताई गाडे यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. आता पाऊस उघडला असल्यामुळे संपूर्ण शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला गती आली आहे. पॅचींगचे कामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. यासाठी आज त्या कामाची तपासणी करून उत्कृष्ट दर्जेचे पॅचींग करण्याचे आदेश दिले अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.गुलमोहर रोड वरील खड्डे बुजवण्याच्या कामाची तपासणी करताना आमदार संग्राम जगताप समवेत घनशाम शेलार, नगरसेवक बाळासाहेब पवार, अजिक्य बोरकर, निखिल वारे, अमोल गाडे, शहर अभियांता सुरेश इथापे, इंजि. श्रीकांत निबांळकर, मनोज पारखी, कुमार नवले, योगेश खरमाळे, अनुम सत्राळकर, विनोद भिंगारे, अरबाज शेख, गणेश गोधाडे, आदी उपस्थित होते.आमदार संग्राम जगताप म्हणाले की खड्डे बुजवण्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाल्यावर पुन्हा ते काम करावे लागत नाही. यासाठी पॅचींगचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी अधिकार्‍यांनी कामावर लक्ष केंद्रीत करावे.