
अहमदनगर (दि ७ नोव्हेंबर २०२०) : आजची तरुण पिढी फास्ट आहे, नवनवीन गोष्टी आत्मसात करुन त्यात आपले भविष्य शोधत असते. आज जमान्याबरोबर जो चालेल तोच या स्पर्धेच्या युगात टिकू शकले. त्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी गरजेची आहे. स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून मोठ्या पदापर्यंत पोहचणे कठिण काम आहे. आयपीएसपर्यंत फार कमीजण पोहचतात त्यामुळे जेब शेख याने मिळविलेले यश हे नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे. युवकांसाठी ते आयडॉल आहेत, असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.
याप्रसंगी जेब शेख सत्कारास उत्तर देतांना म्हणाले, कोणतीही गोष्ट सध्या करण्याचे ध्येय ठेवून काम केल्यास यश मिळतेच. आज अनेक कंपन्या, सरकारी अधिकारी पदांसाठी विविध परिक्षा महत्वाचा घटक आहे. आपणाला ज्या क्षेत्रात करिअर करावयाचे त्या क्षेत्रात ध्येय ठेवून काम केल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. आज माझा जो सत्कार झाला आहे, तो मला प्रेरणादायी राहील. पुढील काळात तरुणांना स्पर्धा परिक्षांसाठी आवश्यक असल्यास मार्गदर्शन करु, असे सांगितले. याप्रसंगी परेश लोखंडे यांनी शेख जेब यांच्याविषयी गौरोद्गार काढून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शेवटी शेख जाकिर यांनी आभार मानले.
