
*प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जन्मदिना निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रदर्शन धरती चौक अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले होते विविध मान्यवरांनी या पुस्तक प्रदर्शनास हजेरी लावली आणि आयोजकांचे अभिनंदनही केले
अहमदनगर (दि ३१ ऑक्टोबर २०२०) : प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांनी संपूर्ण मानव जातीसाठी जी शिकवण दिली आणि संपूर्ण मानव जातीला अंधारातून उजेडाकडे आणले ते केवळ मुसलमानांचे नसून ते समस्त विश्वाला प्रदान करण्यात आलेले साक्षात करुणा सागर आहेत त्यांचा संदेश सर्वापर्यंत पोहोचावे हेच उद्देश या पुस्तक प्रदर्शन मागे होता याप्रसंगी उपस्थित मान्यवराना पुस्तके भेटही देण्यात आली अहमदनगरचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पुस्तक प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे अभिनंदन केले.
मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष अभिजीत वाघ सर यांनीही भेट दिली व आजच्या काळात या पुस्तकांची फार गरज आहे असे यावेळी उद्देशून सांगितले, यावेळी मार्किट समितिचे सेक्रेटरी केंडके दादा, सामाजिक कार्यकर्ता सलीमभाई जरीवाला, परेश लोखंडे, उमेश भागानगरे महाराज, मुफ़्ती अल्ताफ अहमदनगरी, डॉ. परवेज़ अशरफी, आसिफ दुलेखान, आर्क. फ़िरोज़ शेख, अरबाज़ शेख, सद्दाम कुरेशी तसेच परिसरातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्यानी उपस्तित होते.या पुस्तक प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी फिरोज शेख, अलतमश जरीवाला, अयूब खान, मकबूल सर, यूनुस शेख व आदिनी परिश्रम घेतले.
