
अहमदनगर- मोहम्मद पैगम्बर सल्ललाहू अलैही व सल्लम जयंती (ईद ए मिलाद) निमित्त सालाबाद प्रमाणे शहरातील तख्ती दरवाजा (मीर मुर्तूजा तख्ती दरवाजा महल) येथे मोहम्मद पैगम्बर यांचे पवित्र केसांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवित्र केसांचे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर फिजीकल डिस्टन्ससह नियमांचे पालन करुन मोजक्या भाविकांची उपस्थिती होती.तसेच इतर धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.देशात सात ते आठ ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांचे पवित्र केस आहे. यामध्ये अहमदनगर,औरंगाबाद, नागोर, बडीखाटू (राजस्थान), मध्यप्रदेश, काश्मीर आणि तुर्कस्तान देशातील आस्तंबूल या गावाचा समावेश आहे. अहमदनगरच्या मोघल कालीन इतिहासात हजरत मोहम्मद पैगंबराच्या (स.) पवित्र केसांचा उल्लेख आलेला आहे.इराक व इराण बॉर्डरवर असलेले मशहद (शहिदांचे गाव) शहरातून हजरत मोहम्मद पैगंबराचे पवित्र केस आणले असून,परंपरेनुसार फक्त मोहंद पैगंबर जयंतीच्या दिवशी हे पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येत असल्याची माहिती पुजारी सय्यद बुर्हाण यांनी दिली.यावेळी मीर मुर्तूजा तख्ती दरवाजा महलला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.
