
अहमदनगर (दि ३१ ऑक्टोबर २०२०) : शहर स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला. दिवाळी सणाच्या दृष्टिने शहरामध्ये साफ सफाई योग्य पध्दतीने होणे आवश्यक आहे.
याकरिता घनकचरा विभागाची आढावा बैठक महापौर बाबासाहेब वाकळे यांनी 29 रोजी घेतली. यावेळी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, सभागृह नेता स्वप्निल शिंदे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, नगरसेवक रविंद्र बारस्कर,राहुल कांबळे, रामदास आंधळे, संजय ढोणे, उदय कराळे, मनोज ताठे,सतिष शिंदे, अजय चितळे, घनकचरा विभाग प्रमुख डॉ.श्री.नरसिंह पैठणकर,मुख्य स्वच्छता निरिक्षक किशोर देशमुख, परिक्षीत बिडकर, तुकाराम भांगरे, स्वच्छता निरिक्षक प्रशांतरामदीन, अविनाश हंस, सुरेश वाघ,बाळू विधाते, राजेंद्र सामल, स्वयंभू ट्रान्सपोर्टचे मॅनेजर अजय थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिकेने स्वच्छता अभियानात अतिशय चांगले काम करून देशामध्ये 40 वा नंबर मिळविला. परंतु काही दिवसा पासून स्वच्छतेच्या कामामध्ये हलगर्जीपणा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळी सणाच्या दृष्टिने शहरामध्ये स्वच्छता होणे आवश्यक आहे. मध्यतरी झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेने गवत, झाडे झुडपे वाढलेले आहेत.तसेच ब-याच ठिकाणी झाडांच्या फांदया तोडून रस्त्याच्या कडेने पडलेले आहेत. ते उचलणे आवश्यक आहे.स्वच्छता अभियानाचा पुढचा टप्पादेखील सुरू झालेला आहे.
यावेळेला नगर शहराचे स्वच्छते बाबत 10 च्या आतमध्ये नंबर येण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावे. मनपाला देशामध्ये 40 वा नंबर आलेला आहे.स्वयंभू ट्रान्सपोर्टचे काम चांगले झाल्यामुळेच मनपाचे नांव देशामध्ये झळकले. काही दिवसा पासून नागरिकांच्या कचरा कलेकशन बाबत तक्रारी वाढत आहेत. ठेकेदार संस्थेने प्रत्येकाच्या दारात घंटागाडी गेली पाहिजे अशी व्यवस्था करावी. रस्त्याच्या कडेने पडलेला कचरा तातडीने उचलने बाबत कार्यवाही करावी.मुकादम यांनी प्रभागामध्ये दररोज फिरून कचरा पूर्ण क्षमतेने उचलला पाहिजे अशा सुचना दिल्या. कामामध्ये जर हलगर्जीपण आढळून आला तर स्वच्छता निरिक्षक यांचेवर कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.
प्रत्येकाला प्रभागामध्ये नेमून दिलेले काम व्यवस्थीत पणे करणे, रस्त्याच्या कडेची माती, गवत, कचरा उचलून घेण्याबाबत कार्यवाही करावी. शहर स्वच्छ राहील या दृष्टिने सर्वांनी काम करावे असेही ते यावेळी म्हणाले.ठेकेदार संस्थेने देखील 100 टक्के कचरा उचलण्याच्या दृष्टिने वाहने उपलब्ध करून दयावी. वेळोवेळीघनकचरा विभाग प्रमुख ,मुख्य स्वच्छता निरिक्षक, यांनी दिलेल्या सुचनेनुसारकचरा उचलणे बाबत पुर्तता करावी.
