
अहमदनगर (दि २९ ऑक्टोबर २०२०) : विवाह जमविण्यासाठी पालकांची धावपळ होत असते. त्या धावपळीत सुयोग स्थळे निघूनही जातात. अवास्तव अपेक्षा आणि मिळाली संधी गेल्यामुळे पालकांच्या पदरी निराशा पडते. या कालावधीत मुला-मुलींचे वय वाढत जाते. खूप उशिरा विवाहामुळे अनेक गोष्टींच्या तडजोडी कराव्या लागतात. अशा परिस्थितीत सोयरा मराठा वधू-वर सूचक मंडळाच्यावतीने वेबसाईट सुरु करुन वधू-वरांच्या पालकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. घरबसल्या वेबसाईटवर आपल्याला अनुरुप असे वधू-वरांचे स्थळे पहावयास मिळणार असल्याचे मोठी सोय होणार आहे.
मंडळाच्यावतीने विवाह जुळविण्यासाठी वधू-वर, पालक मेळावे, व्हॉटस्अप ग्रुप आदिंच्या माध्यमातून अनेक विवाह जुळविले आहे. या आधुनिकतेची कास धरुन मंडळच्या वतीने सुरु करण्यात येत असलेल्या वेबसाईटचा लाभ वधू-वरांसह पालकांना होणार असल्याचे प्रतिपादन सरकारी वकिल अॅड. सतीश पाटील यांनी केले.
सोयरा मराठा वधू-वर सूचक मंडळाच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सरकारी वकिल अॅड. सतीश पाटील, ज्येष्ठ पत्रकार डॉ. अॅड. बाळ ज. बोठे, भास्करराव नरसाळे, प्रकाश खेडकर, पारस मुनोत, चंद्रशेखर गुंजाळ, अशोक दाणी, सौ. संजीवनी दाणी, सौ. मंगला गुंजाळ आदि उपस्थित होते.
यावेळी माहिती देतांना चंद्रशेखर गुंजाळ म्हणाले, सोयरा मराठा वधू-वर मंडळाच्या माध्यमातून वधू-वरांचे विवाह जुळविण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. यासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. आता पालकांना चांगले विवाहयोग्य वधू-वर घरबसल्या पहाण्यास मिळविण्यासाठी वेबसाईट सुरु करत आहोत. सर्व पालकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या विवाहयोग्य वधू-वरांची नोंदणी या वेबसाईटवर करावे, असे अवाहनही त्यांनी केले. ही वेबसाईट विनक्लिक सॉफ्टवेअर कंपनीने तयार केले आहे. सोयरा मराठा मंडळाच्यावतीने वधू-वरांच्या माहिती संकलनाचे काम सुरु असल्याचे दाणी यांनी सांगितले.
