
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या पॅचिंगच्या कामास सुरुवात
अहमदनगर (दि २९ ऑक्टोबर २०२०) – मागील काही दिवसांपूर्वी नगर शहरात अतिवृष्टी झाल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ- मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना रस्त्यावरुन ये-जा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत आ.संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करुन हे रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.आज (दि.29) रोजी या कामाला सुरुवात झाली. या कामाची आ.संग्राम जगताप यांनी पाहणी करुन विविध सूचना केल्या.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते,धनेश कोठारी, अफजल शेख,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले,गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती. याबाबत आपण प्रमुख रस्त्यांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजगुरु, उपअभियंता गायकवाड यांच्या समवेत औरंगाबाद-पुणे-मनमाड या प्रमुख महामार्गाची मध्यरात्री पाहणी करुन या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याबाबत सूचविले होते. त्या अनुषंगाने आज अहमदनगर शहरात प्रमुख रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या पॅचिंगच्या कामास सुरुवात झाली यावेळी आ. जगताप यांनी रस्त्याची पाहणी केली.
