
अहमदनगर (दि २८ ऑक्टोबर २०२०) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर करण्याचे स्वप्न पाहिले आहे.त्यांच्या या महत्त्वाकांक्षी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्यांनी प्रयत्न करावेत. या योजनेंतर्गत समाजातील प्रतिष्ठीत व तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन मिळवून आपले व्यवसाय, नोकरी यामध्ये प्रगती साधता येईल. त्यातून मेक इन इंडिया सारख्या योजनेला चालना मिळून प्रत्येकजण आत्मनिर्भर होईल. यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येत आहे. याद्वारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेऊन प्रगती साधावी. याबाबत लवकरच प्रत्येक भागात तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येईल. नूतन पदाधिकारीही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील, असा विेशास भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी व्यक्त केला.
यावेळी संयोजकपदी सी.ए.सिद्धार्थ ठाकूर, सहसंयोजकपदी टॅक्स कन्सल्टंट सिद्धार्थ गदीया, डॉ.दर्शन करमाळकर, अॅड.आशिष पोटे, नीलेश सातपुते आदींची नियुक्ती करुन पत्र देण्यात आले.याप्रसंगी महेश तवले म्हणाले, आज युवकांमध्ये काहीतरी करुन दाखविण्याची क्षमता आहे.अशा युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास देशाच्या प्रगतीत ते हातभार लावू शकतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत जिल्ह्यातील युवक व सर्वसामान्यांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करुन त्यांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत.
याप्रसंगी सीए सिद्धार्थ ठाकूर म्हणाले, आज सरकारी, कंपनी, कायदा आदी विषयांवर कार्यकर्ते, पदाधिकारी अभिज्ञ असतात. ही माहिती मिळाल्यास कामे लवकरच मार्गी लागतील.आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्ही यशस्वी पार पाडू असेसांगितले.यावेळी अभिजित चिप्पा,लक्ष्मीकांत तिवारी, वसंत राठोड,सुजित खरमाळे, सुबोध रसाळ,पियुष संचेती, किरण जाधव,आनंद निंबाळकर, साहिल शेख,किशोर कटोरे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक अमोल निस्ताने यांनी केले. सूत्रसंचालन आशिष अनेचा यांनी केले तर शेवटी अभिजितचिप्पा यांनी आभार मानले.
