पुणे (दि २६ ऑक्टोबर २०२०) : मोटारीतून मॅफेड्रोनची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना कात्रज चौकात पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख 63 हजारांचे 213 ग्रॅम मॅफेड्रोन जप्त करण्यात आले.विसारत अली सनीउल्ला (वय 32, रा. धनकवडी, मूळ-बिहार) आणि ब्रीजेश उपेंद्र शर्मा (वय 38, रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अंमली व खंडणी विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कात्रज चौकात मुंबई बायपासकडे जाणार्‍या रस्त्यावर काल दोघेजण मोटारीतून मॅफेड्रोनची तस्करी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पथकाने सापळा रचून विसारत आणि ब्रीजेशला ताब्यात घेतले त्यांच्या मोटारीत 10 लाख 63 हजार रुपये किंमतीचे 213 ग्रॅम मॅफेड्रोन जप्त करण्यात आले.

त्याशिवाय मोटार आणि मोबाईल असा 15 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर,राहूल जोशी,शिवाजी राहिगुडे, प्रशांत बोमादंडी, मनोळ साळुंके, संतोष जाचक, विशाल शिंदे, चेतन गायकवाड,विशाल दळवी, चेतन शिरोळकर, अमित छडीदार योगेश मोहिते यांच्या पथकाने केली