
*दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत अहवाल*
*आज ३९१ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*
*आतापर्यंत ५२ हजार १९८ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३३ टक्के*
अहमदनगर: जिल्ह्यात आज ३९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४३३ इतकी आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्येमनपा ८८, अकोले ३८, जामखेड १५, कर्जत १८, कोपरगाव ०९, नगर ग्रा १६, नेवासा २२, पारनेर १९, पाथर्डी २३, राहाता २८, राहुरी १२, संगमनेर ४४, शेवगाव २३, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर २२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
