
पुणे (दि ६ ऑक्टोबर २०२०) : बांधकाम व्यवसायिक राजेश हरिदास कानाबार ऊर्फ राजूभाई (वय.64, रा. सोपानबाग घोरपडी) यांचा काल (सोमावार) दुपारी पावने तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील असलेल्या एसबीआय बँकेच्या गेट जवळील फुटपाथवर बंदूकीतून गोळी झाडून खून करण्यात आला.या प्रकरणी, राहुल कांबळे, रुपेश कांबळे, गणेश कुऱ्हे व अज्ञात मारेकऱ्यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चालक विश्वास दयानंद गंगावणे (रा. गांधीनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व्यावसायिक राजेश कानाबार आणि संशयीत आरोपी राहुल कांबळे, रुपेश कांबळे,गणेश कुऱ्हे यांच्यामध्ये बावधन येथील जमिनीसंदर्भात केस चालू होती.दरम्यान फिर्यादी चालक विश्वास गंगावणे याच्या माहितीनुसार, त्याचा निकाल राजेश कानाबार उर्फ राजूभाई यांच्या बाजूने लागणार असल्याचा आरोपींना अंदाज आला होता. त्यामुळे आरोपी व बावधन येथील जमीनीवर डोळा असलेल्या काही लोकांच्या मार्फत संगनमताने राजूभाईचा खून झाल्याची शक्यता आहे. त्यानुसार राहुल, रुपेश व कुऱ्हे यांच्यासह अज्ञात मारेकऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
