एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयकडे सोपवण्यात आलेल्या रिपोर्टवरून, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. जर सीबीआय चौकशीवरही विश्वास नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“अगदी सुरुवातीपासूनच या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असेलल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा रिपोर्ट आहे. ज्यांचा कोणताही राजकीय संबंध नाही किंवा शिवसेनशी देखील संबंध नाही.” असं संजय राऊत म्हणाले