*दिनांक: ०५ ऑक्टोबर, २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत अहवाल*
*आज तब्बल १०३१ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*
*आतापर्यंत ४२ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.१० टक्के*

*अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.१० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९०४ इतकी आहे.

दरम्यान, आज १०३१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा १७१, अकोले ६७, जामखेड ३९, कर्जत ४४, कोपरगाव ४३, नगर ग्रा. ६७, नेवासा ७१, पारनेर ५७, पाथर्डी ३३, राहाता ८४, राहुरी ६०, संगमनेर ९४, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ११३, कॅन्टोन्मेंट ०९, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:४२४६४*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:२९०४*
*मृत्यू:७३६*
*एकूण रूग्ण संख्या:४६१०४*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
*माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी*