*दिनांक: २६ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल*
*आज ५१३ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज*
*आतापर्यंत ३६ हजार १५७ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्के*
*आज १२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर*

*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १२१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९४५ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६२, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०५, श्रीगोंदा ०४,पारनेर ०१, अकोले १७, कोपरगाव ०२, कर्जत ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा  रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५१३ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा ८०, संगमनेर २७, राहाता ५८, पाथर्डी ३६, नगर ग्रा. ४२, श्रीरामपूर १५, नेवासा १९, श्रीगोंदा ०७, पारनेर २३, अकोले ४६, राहुरी ३३, शेवगाव १५, कोपरगाव ४७, जामखेड ४०, कर्जत २०, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३६१५७*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३९४५*
*मृत्यू:६६९*
*एकूण रूग्ण संख्या:४०७७१*

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
*#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी*