
अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हिडसनने, भारतातील व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे.भारतात गेल्या १० वर्षात कंपनीने मोटारसायकल्सचे एकूण ३०,००० युनिट्स विकले गेले आहेत.दरम्यान, हार्ले डेव्हिडसनने भारतातील मॅन्युफॅक्चरिंग केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे देशातील या कंपनीच्या ३५ डीलरशिपशी संबंधित सुमारे २००० नोकर्या देखील धोक्यात आल्या आहेत.गेल्या चार वर्षांत हार्ले डेव्हिडसन भारतीय बाजारपेठ सोडणारी ७ वी परदेशी वाहन वाहन कंपनी आहे. यापूर्वी जनरल मोटर्स, फियाट, Ssangyong, स्कॅनिया, MAN आणि UM Motorcycles नेही भारतीय बाजार सोडला आहे.

हार्ले डेव्हिडसनने भारतात आपले कामकाज बंद केल्यावर त्याचा थेट परिणाम कंपनीच्या ३५ डीलरशिप आणि देशभरातील २,००० नोकर्यावर होईल, अशी भिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एफएडीए) व्यक्त केली. यासोबतच, हार्ले डेव्हिडसन देशाबाहेर गेल्यामुळे या ब्रँडच्या डीलर पार्टनरला १३० कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान होऊ शकते.असा अंदाज देखील एफएडीएद्वार वर्तवण्यात आला आहे.कंपनीने जारी केलेल्या पत्रकात काय म्हटले आहे भारतातील ग्राहकांना त्यांच्या वाहनांची देखभाल करण्यासाठी आणि सुट्या भागांसाठी कसलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

आगामी काळात परिस्थिती पाहून कंपनी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यत आले आहे.भारतात महागड्या आणि जास्त क्षमतेच्या मोटरसायकलला फारशी मागणी नाही. या कंपनीने बराच प्रयत्न करूनही गेल्या अनेक वर्षापासून विक्री होत नसल्यामुळे शेवटी उत्पादन बंद लागले असे मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे.एफएडीएचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्ले डेव्हिडसन यांनी अद्याप आपल्या कोणत्याही डीलर पार्टनरला भारतात काम बंद करण्याचे कंपनीच्या योजनेबद्दल माहिती दिलेली नाही.त्यामुळे यासंदर्भात अद्याप व्यापारांना कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

ज्या प्रसिद्ध ब्रँडमध्ये ज्यांनी आपली कमाई केलेली भांडवल गुंतविली आहे त्यांना कोणतेही नुकसान भरपाई पॅकेज न देता वाऱ्यावर सोडले जाते असा आरोपदेखील गुलाटी यांनी केला आहे.तसेच ते पुढे म्हणाले, हार्ले डेव्हिडसनसारख्या लक्झरी ब्रँडची डीलरशिप तयार करण्यासाठी सुमारे ३-४ कोटी रूपये गुंतवावे लागतात. कंपनीकडे देशात एकूण ३५ डीलरशिप आहेत, ज्याची किंमत सुमारे ११०-१३० कोटी इतकी रुपये असेल. सरासरी ५० कर्मचारी लक्झरी डीलरशिपवर काम करतात, त्यानुसार ३५ डीलरशिपमध्ये १८०० ते २००० लोक असतील ज्यांच्या नोकऱ्यांवर हार्ले डेव्हिडसने घेतलेल्या निर्णयामुळे गदा येणार आहे.हार्ले डेव्हिडसनने अर्थिक वर्षात २५०० पेक्षा कमी युनिट्स विकल्या आहेत. जर कंपनीने आपले असेंब्ली प्लाँट बंद केले तर भारतातील ही दुसरी कंपनी असेल. यापूर्वी जनरल मोटरर्सने २०१७ मध्ये आपल्या गुजरातच्या प्लांटची विक्री केली होती
