
अहमदनगर शहरातील राजकारण ज्याला समजले तो जिल्ह्यात काय राज्यात काय तर दिल्लीलाही फेल होऊ शकत नाही. अहमदनगरच्या गल्लीचे राजकारण हे दिल्लीचे राजकारण असेही म्हटले तर वावगं होणार नाही.या राजकारणाबद्दल आता बोलायचं यासाठी कारण अहमदनगर महानगर पालिकेत भाजपचे महापौर हे राष्ट्रवादीचे वाकळे आहेत किंवा राष्ट्रवादीचे महापौर हे भाजपचे वाकळे आहेत असं दोन्ही दिशेने काहीही चूक नाही यात भर म्हणून कालची निवडणूक भाजपचे कोतकर हे राष्ट्रवादीचे सभापती झाले कि राष्ट्रवादीचे कोतकर भाजपचे सभापती झाले असा प्रश्न उभे राहण्यामागेही कारण तेवढेच मोठे कारण भाजपचे राष्टवादीयुक्त महापौरांनी या बद्दल म्हटले आहे कि हि सर्व राजकीय खेळी आहे कोतकरांनी सभापती होण्यासाठी गुपचूप राष्ट्रवादी प्रवेश केला आणि जाहिरपणे ते आमचेच आहेत. म्हणजेच आम्ही अहमदनगरकरांनी हेच समजायचे कि जसे महापौर तुम्ही भाजपचे जाहीरपणे आहात परंतु गुपचूप पणे राष्ट्रवादीची ओढ तुम्हाला लागली असल्याची चर्चा तर आहेच आणि राष्ट्रवादीच्या सहकार्यानेच तुम्ही भाजपचे महापौर झालेले आहात हेही सर्वश्रुत आहे. पत्रकारांना काय सांगायचे आणि माध्यमांमध्ये या निवडणुकीबद्दल काय चर्चा रंगवायची हेही तुमचे ठरलेलेच. आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय भाजपचे कोतकर हे राष्ट्रवादीचे सभापती झाले का? हे तर शक्यच नाही थोडक्यात काय तर महाविकास आघाडीला महाराष्ट्र्राच्या स्तरावर सर्वाधिक विरोध असेल तर तो कोणाचा आणि सध्या महाविकास आघाडी समोर विरोधी पक्ष कोणता तर एकच उत्तर आहे भाजप परंतु हे समीकरण आमच्या अहमदनगरच्या राजकारणात शक्यच नाही कारण आमच्या अहमदनगरमध्ये भाजपचे राष्ट्रवादी पुरस्कृत महापौर आणि काल निवडून आलेले राष्ट्रवादीचे भाजप पुरस्कृत सभापती हे आम्ही सर्व एकच आहोत आणि असे असणे हे अहमनगर शहर विकासाच्या दृष्टीने चांगलेच आहे.एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ! माग दोन चार दिवसापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजविणे करीता आक्रमक भूमिका बजावत महापौरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना काळे फासण्याचे वक्तव्य केले परंतु शहरातील अंतर्गत सर्वच रस्ते खड्डे युक्त झाले आहे आता यासाठी कोणी काळे फासायचे. ड्रेनेज लाईनच्या कामासाठी संपूर्ण शहरातील रस्ते खोदून अक्षरश: वाट लावली आहे परंतु फक्त महामार्गाचा वापर करणारे महापौर शहरातील अंतर्गत रस्त्यांकडेही लक्ष देतील का असा प्रश्न सामान्य अहमदनगरकरांना पडला आहे.
