दिनांक: १६ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल

आज तब्बल ८४० रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला २८ हजारांचा टप्पा

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५७ टक्के

आज २८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९०२ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, संगमनेर ०१, राहाता ०१, नगर ग्रामीण ०२, कॅंटोन्मेंट ०१, राहुरी ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८४० रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २५०, संगमनेर ६२, राहाता ६९, पाथर्डी ०५, नगर ग्रा ५६, श्रीरामपूर ७८, कॅन्टोन्मेंट१४, नेवासा ४०, श्रीगोंदा ३७, पारनेर २५, अकोले २७, राहुरी ४२,
शेवगाव ४६, कोपरगाव २१,जामखेड ३२, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: २८५१२

उपचार सुरू असलेले रूग्ण:३९०२

मृत्यू:५२१

एकूण रूग्ण संख्या:३२९३५

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

STAY HOME STAY SAFE

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका