*दिनांक: १४ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल*
*आज तब्बल ८३५ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज*
*आतापर्यंत २६ हजार ९९१ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९५ टक्के*
*आज २४३ बाधितांची रुग्णसंख्येत भर*


*अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३७५१ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६६  संगमनेर ३६, राहाता ०३, पाथर्डी ०९, नगर ग्रामीण २०, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट १६, नेवासा २६, अकोले १४, राहुरी १५, शेवगाव २४, कोपरगाव २५ आणि जामखेड ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८३५ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये,मनपा २५२, संगमनेर ८२, राहाता ५१,पाथर्डी ३६,नगर ग्रा ५१, श्रीरामपूर ५८, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा ४५, श्रीगोंदा ३६, पारनेर २४, अकोले ३५, राहुरी ४८, शेवगाव ०६, कोपरगाव १७, जामखेड ३८, कर्जत ३३, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या= २६९९१*
*उपचार सुरू असलेले रूग्ण=३७५१*
*मृत्यू=४८१*
*एकूण रूग्ण संख्या=३१०४३*

जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*