
अहमदनगर (दिनांक: १२ सप्टेंबर २०२०)। उत्तम क्वालिटी, सस्मित सेवा अन् विश्वास ही त्रिसूत्री व्यवसायात निश्चित यश मिळवून देते, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.येथील प्रोेफेसर कॉलनी चौकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘द मँगो मिनी मार्ट’ या अद्ययावत दालनाचा शुभारंभ करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव सुनिल रामदासी, भाजपचे माजी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
गंधे म्हणाले, गृहोपयोगी दर्जेदार अत्यावश्यक साहित्य वाजवी दरात उपलब्ध करून देण्याच्या सद् हेतूने ‘द मँगो मिनी मार्ट’ हे दालन थाटण्यात आले आहे. नगरकरांना येथे उत्तमोत्तम साहित्य जवळून पहाण्याचा अन् स्वत:च्या हाताने खरेदी करण्याचा आनंद लुटता येणार आहे, हेच या दालनाचे वेगळेपण आहे.आ. संग्राम जगताप म्हणाले, नगर शहरासभोवतीची उपनगरे झपाट्याने वाढत असून युवकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत.परिसराची गरज लक्षात घेऊन कल्पकतेने व्यवसायाची निवड करून संधीचे सोने करणे युवकांच्या हाती आहे. ‘द मँगो मिनी मार्ट’ हे दालन म्हणजे ज्येष्ठाच्या मार्गदर्शनाखाली युवकाने टाकलेले हे पाऊलच आहे. युवकाला प्रोत्साहन देण्यासाठी सावेडीकर या दालनास भेट देऊन प्राधान्याने खरेदी करतील, असा विश्वास आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, शुध्द आणि नैसर्गिक, उत्तम क्वॉलिटी व हायजेनिक पॅकेजिंग यावर लक्ष केंद्रीत करून प्रोेफेसर कॉलनी चौकातील म्युनिसिपल शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये कुलकर्णी पिता-पुत्राने सुरू केलेले ‘द मँगो मिनी मार्ट’’ हे दालन नावातील वेगळेपणा नगरकरांसमोर ठेवत ग्राहक सेवेत रूजू झाले आहे. ग्राहक येथे वैशिष्ट्यपूर्ण खरेदीचा आनंद लुटतील.
