आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७३ ने वाढ

अहमदनगर (दि ११ सप्टेंबर २०२०) : आज तब्बल ५८१ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज आतापर्यंत २४ हजार ७३१ रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७९ टक्के आज नव्या १७३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

जिल्ह्यात आज ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ७३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६६६ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, संगमनेर ११, राहता १८, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण २०, कॅंटोन्मेंट ०३, नेवासा २३, पारनेर ०१, अकोले २०, राहुरी ०१, शेवगाव ०५, कोपरगाव १२, जामखेड १८, मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५८१ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १२४, संगमनेर ६८, राहाता ४६, पाथर्डी ४६, नगर ग्रा.०८, श्रीरामपूर ३८, कॅंटोन्मेंट १०, नेवासा ४७, श्रीगोंदा ४०, पारनेर २२, अकोले ०६, राहुरी २४, शेवगाव १७, कोपरगाव ३३, जामखेड २१, कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ०९ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या= २४७३१

उपचार सुरू असलेले रूग्ण=३६६६

मृत्यू=४३२

एकूण रूग्ण संख्या=२८८२९

(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

STAY HOME STAY SAFE

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या