अहमदनगर (दि ५ सप्टेंबर २०२०) : अहमदनगर यतिमखाना संस्थेला शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या माध्यमातून नरेंद्र फिरोदिया यांच्या कडून रोटी मेकर मशीन भेट देण्यात आली.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे अहमदनगर शहर आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविणारे आणि गोर गरीब होतकरुंच्या मदतीला धावून जाणारे असे नरेंद्र फिरोदिया यांचा या उपक्र्माबद्दल यतिमखाना अहमदनगर संस्था संचालक मंडळ,सदस्य आणि कार्यकारिणी मार्फत तसेच अहमदनगर शहरातील विविध सामाजिक संस्था आणि अहमदनगर शहर वासियांतर्फे नरेंद्र फिरोदिया यांचे आभार मानण्यात आले.