अहमदनगर (दि ३० ऑगस्ट २०२०) : जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१६ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१८९ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०७, अकोले ०३, राहुरी ०१, शेवगाव १९ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ४१९ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १४२, संगमनेर १८, राहाता ११, पाथर्डी २३, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट ०८, नेवासा १४, श्रीगोंदा १९, पारनेर १८, अकोले २३, राहुरी ०६, शेवगाव १०, कोपरगाव ५३, जामखेड २४, कर्जत १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: १७१७६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३१८९*

मृत्यू: २८८

एकूण रूग्ण संख्या=२०६५३

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*STAY HOME STAY SAFE*

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका