अहमदनगर । कोरोना महामारीच्या संकटकाळात जिल्ह्यातील नागरिकांसाठी आधार ठरलेल्या व कोरोनाशी लढा देण्यास सर्व प्रथम पुढे आलेल्या बुथ हॉस्पिटलला शीख, पंजाबी समाज, गुरुद्वारा भाई दयासिंग गुरुद्वारा व पंजाबी सेवा समितीच्या वतीने 61 हजार रुपयाचा धनादेश मदत स्वरुपात देण्यात आला. तर कोरोना महामारीत निस्वार्थपणे मोठ्या जबाबदारीने सेवा देणारे मेजर देवदान कळकुंबे, साळवे, डॉ.अभिजीत केकान, मनपा पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम व प्रदीप पंजाबी यांचा सन्मान करण्यात आला.गोविंदपूरा येथील गुरुद्वारा भाई दयासिंग गुरुद्वारा येथे झालेल्या या कार्यक्रमात जनक आहुजा यांच्या हस्ते बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. तसेच अनिल जग्गी व जग्गी परिवाराच्या वतीने बुथ हॉस्पिटलला वॉटर कुलर देण्यात आले. यावेळी गुरुद्वार्‍याचे अध्यक्ष गुरुदयालसिंग वाही, लकी वाही, जगदीश बजाज, सरबजीत ओबेरॉय, अमित दुग्गल, कॅप्टन चावला, अमरजीत वधवा, पिंकी मक्कर, गुरभेजसिंग बजाज, हितेश ओबेरॉय, अजय पंजाबी, सुनिल सहानी, मोहित पंजाबी आदि उपस्थित होते.जेंव्हा सर्व कोरोना आजाराशी घाबरले तेंव्हा बुथ हॉस्पिटल कोरोनाशी लढण्यासाठी पुढे आले. बुथ हॉस्पिटल जिल्ह्यातील पहिले कोरोना सेंटर असून, या सेंटरमधून अनेक नागरिक कोरोनापासून चांगले होऊन घरी परतले आहेत. शहरात कोरोनाचे प्रार्दुर्भाव झपाट्याने वाढत असताना बुथ हॉस्पिटलची टिम अथकपणे आपली सेवा देत आहे. बुथ हॉस्पिटलचा मदतीची गरज असून, ही जाणीव ठेऊन ही मदत देण्यात आली असल्याचे जनक आहुजा यांनी सांगितले. बुथ हॉस्पिटलची निस्वार्थ भावनेने चालू असलेली रुग्णसेवा ही ईश्‍वसेवा असल्याची भावना गुरुदयालसिंग वाही यांनी व्यक्त केली. देवदान कळकुंबे यांनी शीख, पंजाबी व सिंधी समाज नेहमीच सेवा करण्यास पुढे असतो. गुरुद्वारा व समाजाच्या वतीने मिळालेल्या सन्मान बहुमोल असून, सामाजिक भावनेने केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार मानले.