अहमदनगर । अलकरम सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल सोसायटी व विविध यंग पार्टीच्यावतीने व जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने गुरुवार दि. 27 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 ते संध्या 5 वाजेपर्यंत बारा इमाम कोठला येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाहनावाज तांबोळी यांनी दिली.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोहरम, गणपती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यास प्रतिसाद देत नगर शहरातील यंग पार्टीच्यावतीने मोहरम मधील विविध सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. परंतु सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान सारखा उपक्रम राबविण्यात येत आहे. सध्या कोरोनामुळे प्लाझा दान होणे गरजेचे आहे त्याचबरोबरच रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त यंग पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन शाहनवाज तांबोळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी फो.9273675333 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.