
अहमदनगर (दि २३ ऑगस्ट २०२०) : जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २८८१ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६२, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०४, पारनेर ०१, अकोले ०१, जामखेड ०५ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ४२४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १९७, संगमनेर २९, राहाता ०९, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३७, श्रीरामपूर १२, कॅन्टोन्मेंट १४, नेवासा १३, श्रीगोंदा १९, पारनेर ३०, राहुरी ०७, शेवगाव १२, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: १३४७८
उपचार सुरू असलेले रूग्ण:२८८१
मृत्यू: २२६
एकूण रूग्ण संख्या:१६५८५
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
