
अहमदनगर (दि १९ ऑगस्ट २०२०) : आयुष्यभर अभियंता म्हणून कर्तव्य बजावणारे एन.डी. कुलकर्णी लेखक म्हणूनही चांगले लिखाण केले आहे. त्यांनी लिहिलेल्या कैलासमान सरोवर यात्रेचे वर्णन वाचतांना व पुस्तकाची प्रस्तावना लिहितांना मला भरून आले. प्रत्यक्ष कैलास पर्वताचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. एन.डी. कुलकर्णी हे सर्वमान्य असलेल्या लेखकांपैकी नाहीत, पण त्यांनी मनात उमलेल्या भावना अतिशय सुरेख पद्धतीने प्रतिबिंबित केल्या आहेत.पुस्तकातील प्रत्तेक शब्द, वाक्य अर्थपूर्ण आहे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष त्याठिकाणी उभे आहोत याची अनुभूती येते. हे लिखाण अप्रतिम आहे. एका अभियंत्याने कैलासमान सरोवराच्या यात्रेचे केलेले लिखाण हे मराठी साहित्यातील एक अलौकिक असा प्रयोग आहे. जे जे हे प्रवास वर्णन वाचतील त्यांना कैलास मान सरोवराची प्रत्यक्ष अनुभूती येईल व यात्रेला जाण्याची प्रेरणा मिळेल.पुस्तकाच्या विक्रीतून मिळणार्या निधीतून पद्मदत्त स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सानाजिक काम करण्याचा उपक्रमही स्तुत्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नगरचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के यांनी केले.महानगरपालिकेचे सेवानिवृत्त शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांच्या कैलासमान सरोवर यात्रेचे प्रवास वर्णन व माहिती असलेले तुज वीण शंभो मज कोण तारी या पुस्तकाचे प्रकाशन सौ. स्मिता कुलकर्णी यांच्या हस्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नगरचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोट्याखाणी कार्यक्रमात करण्यात आले.अनिरुद्ध देवचक्के यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. यावेळी श्रीमती हेमा तवले,श्रीमती सुमन कुलकर्णी, किशोर थत्ते, नंदकिशोर परदेशी, एस.एम.कुलकर्णी, प्रभाकर मुळे, सुभाष पाठक, माधुरी जोशी, श्रीकांत मांढरे,विनय खिस्ती, अनिल पाटील आदि उपस्थित होते. करोनाच्या पोर्शभूमीवर मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. पुस्तका बद्दल माहिती देतांना एन.डी. कुलकर्णी म्हणाले, 2006 पासून कैलासमान सरोवर यात्रेला जाण्याची इच्छा गेल्यावर्षी पूर्ण झाली. अत्यंत खडतर मार्गाने कैलासमान सरोवर यात्रा पायी जात यशस्वीपणे पूर्ण केली होती.

