
अहमदनगर (दिनांक 10 ऑगस्ट 2020) : काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३००९ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये
मनपा २१,
नगर ग्रामीण ०७,
कँटोन्मेंट ०४,
पारनेर ०५,
जामखेड ०१
आणि मिलिटरी हॉस्पीटल ०३
अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ३९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १९५, संगमनेर २९ राहाता ४, पाथर्डी ४, नगर ग्रा.११ श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट ३, नेवासा ११, श्रीगोंदा २०, पारनेर ३६, अकोले १४, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ६, कर्जत ०६, मिलिटरी हॉस्पीटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
