अहमदनगर (दि ९ ऑगस्ट २०२०) : जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता सहा हजारांच्या वर गेली आहे. आजपर्यंत ६२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६७.३४ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २९३१  इतकी झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले.  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  मनपा २३, संगमनेर ०१, राहाता ०१, नगर ग्रामीण १०, कँटोन्मेंट ०१, नेवासा ०२, शेवगाव ०१ आणि कोपरगांव ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ३८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १७२, संगमनेर २३, राहाता ३, पाथर्डी २७, नगर ग्रा.१६, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २१, श्रीगोंदा १८, पारनेर १०, अकोले ४, शेवगाव १४, कोपरगाव ३९, जामखेड ५, मिलिटरी हॉस्पीटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेले एकूण रुग्ण=६२५०

बरे झालेले एकूण रुग्ण=६२५०

उपचार सुरू असलेले रूग्ण=२९३१

मृत्यू: १००

एकूण रूग्ण संख्या=९२८१

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

STAY HOME STAY SAFE