
अहमदनगर –दिलासादायक दुपारी १२ वाजेपर्यंत वाढले फक्त २२ रुग्ण दररोजची १२ वाजे पर्यंत असणारी आकडेवारी आज कमी झाली आहे त्यामुळे अहमदनगर रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक असून लवकरच आपला शहर कोरोनमुक्त होईल. जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९२५ इतकी झाली आहे.
काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये धुळे जिल्हा -०१, मनपा ०५- तारकपूर नगर ०१, कल्याण रोड ०१, गुगळे कॉलनी ०१, अ. नगर शहर २, कॅन्टोन्मेंट ०२, पारनेर १४ – रुई छत्रपती ०१ ,पारनेर १३. दरम्यान, आज एकूण ३४० रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १९७, संगमनेर १४, राहाता १७, पाथर्डी २७, नगर ग्रा.१०, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट ८, नेवासा १०, श्रीगोंदा ९,पारनेर ७, अकोले १, राहुरी ४, शेवगाव ६ कोपरगाव १, जामखेड ४, कर्जत ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज ३४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४३६५ इतकी झाली.
