अहमदनगर ः नगरच्या सांस्कृतिक विश्‍वातील सर्वात महत्वाचा आणि महानगरीचा मोठा उत्सव म्हणून गेली 23 वर्षे गणेशोत्सवात होणारा नगर महोत्सव यावर्षी स्थगित करण्यात आल्याची घोषणा
नगर महोत्सवाचे मुख्य संयोजक सुधीर मेहता यांनी केली आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय
घेण्यात आला आहे. विद्यार्थी, खेळाडू आणि कलाकार सहभागी होणार्या नगरकरांच्या आरोग्याचा विचार करुन हा निर्णय घ्यावा लागला आहे.विद्यार्थीहीत सर्वात महत्वाचे आपण मानतो,असे सुधीर मेहता यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव गर्दी काळात कुठल्याही प्रकारचा अडथळा,त्रास निर्माण होईल असे उपक्रम कोणीच घेऊ नयेत आणि सरकार प्रशासनाच्या प्रयत्नाना साथ देण्याचीच प्रत्येकाची
भूमिका असली पाहिजे असे ते म्हणाले. विद्यार्थीहीत आणि सुरक्षा यादृष्टीनेच गणेशोत्सव आणि कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पर्यटन महोत्सव आणि नगरचे शिल्पकार स्व. नवनीतभाई बार्शीकर स्मृती नगरभूषण पुरस्कार’, .गोपाळराव मिरीकर स्मृती पत्रकारिता आणि स्व.आशा शाह
महिला पुरस्कार,स्व. फिरोदिया, स्व.भालेराव यांचे नावाने घेण्यात आलेल्या नगर पर्यटन पत्रलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येईल. जागृती आणि प्रबोधन या दृष्टीकोणातून विद्यार्थ्याना शाळेत किंवा घरात बसून सहभागी होता येतील अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन निश्‍चित करण्यात येइल. तर फेसबुक, झूम अ‍ॅप वर मोठ्यांसाठी काही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार
असून, सर्व संस्था- संघटनांचे पुर्ववत सहकार्य मिळेल, असा विश्‍वासही सुधीर मेहता यांनी व्यक्त
केला. किल्ला-चाँदबिबी पर्यटनमहोत्सव संदर्भात कार्यक्रमासाठी नाविन्यपूर्ण सूचना, कार्यक्रम
सुचवावेत. सहभाग घेऊ इच्छणार्या संस्था, कार्यकर्त्यानी

9 2 8 4 6 4 0 4 7 7 ,9423793375 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन
करण्यात येत आहे.